नमस्कार माझ्या प्रिय आत्म्यांनो 🙏😊
आपली पृथ्वी सध्या असेंन्शन पिरीएड मधून जात आहे, ह्या पिरीएड मधे अनेक आत्मे जागृत होत आहेत व असेंन्शन प्रोसेस मधे आपले योगदान देत आहेत. आत्मा जागृत होऊ लागला की आपल्यात अनेक लक्षणे दिसू लागतात ज्यामुळे आपल्याला कळते की आपण योग्य मार्गावर आहोत.
चला, तर जाणून घेऊया ही लक्षणे कोणती असतात.
✨ आता त्यांना टीव्ही पाहण्यात पूर्वीसारखा रस उरत नाही.
✨ कोणाशी स्पर्धा करावी, स्वतःला सिद्ध करावे ह्या गोष्टींचा त्यांच्यासाठी आता काही अर्थ उरत नाही. स्पर्धेपेक्षा ते आयुष्य इतरांसोबत वाटून घेण्यात आणि त्याचा शांतपणे आनंद घेण्यात अधिक समाधान मानतात.
✨ ‘पाचवा आयाम’ (Fifth Dimension) ही एखादी जागा नसून ती एक ऊर्जा, एक कंपनांची अवस्था आहे, हे त्यांना जाणवलेले असते.
✨ कोणत्याही अज्ञात गोष्टींची आता त्यांना भीती वाटत नाही. जे भौतिक नाही, डोळ्यांना दिसत नाही तेही या सृष्टीचाच भाग आहे, हे ते समजून घेतात. ज्याला लोक अलौकिक (पॅरानॉर्मल), भितीदायक किंवा विनाशकारी म्हणतात, त्याकडे ते भीतीने नाही तर नैसर्गिक दृष्टीने पाहतात.
✨ ‘नकारात्मकता किंवा वाईटपणा’ ही वेगळी एखादी शक्ती नसून ती भीती, लोभ, स्वार्थ आणि फसवणूक यांतून निर्माण होणारी एक ऊर्जा आहे, हे त्यांना उमगलेले असते.
✨ एकटे राहणे त्यांना आवडते; पण जेव्हा ते इतरांसोबत असतात, तेव्हा ते त्या क्षणात पूर्णपणे आणि मनापासून उपस्थित राहतात.
✨ आपल्या आयुष्याचा काहीतरी खोल अर्थ (लाईफ पर्पज)आहे, याची त्यांना जाणीव असते, आणि तो अर्थ शोधण्याची एक शांत ओढ त्यांच्या आत सतत असते.
✨ त्यांना जाणीव होते की आयुष्यात ‘जिंकणे’ म्हणजे फक्त खुप सारी संपत्ती गोळा करणे किंवा इतरांना हरवून स्वत:ला त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ सिद्ध करणे नव्हे.
✨ खरे यश म्हणजे स्वतःच्या भीतींवर आणि मर्यादांवर मात करणे, आणि आयुष्याच्या शेवटी मन कृतज्ञतेने भरलेले असणे. आपण काय मिळवले ह्या खोल बोधासोबत (भलेही आपण जीवनात सर्व काही मिळवलेले नसले तरी) एक मनुष्य म्हणून आपण कसे घडलो, हेच जास्त महत्त्वाचे आहे, हे त्यांना पटलेले असते.
✨ ते जाणतात की जुन्या आठवणी म्हणजे फक्त हातातून निसटलेल्या गोष्टींची वेदना नसते; हि ती जाणीव असते की त्या त्या सगळ्या व्यक्तींशी पुन्हा कधीतरी भेट होईल, ज्यांच्यावर आपण प्रेम केले होते व ज्यांनी आपले जीवनकाल पूर्ण केला आहे या हळुवार जाणिवेचा त्यांना स्पर्श झालेला असतो.
✨ पृथ्वी सध्या असेंशन पिरीएड मधे आहे..पाचव्या आयामाच्या(5D) दिशेने व आत्ताच्या काळात पृथ्वीवर होणाऱ्या बदलात हे जागृत आत्मे मदत करू इच्छितात. ते यासाठी आपली पूर्ण तयारी करतात.. कारण, ह्या पृथ्वीवर ज्या उद्देश्याला पूर्ण करण्यासाठी ते आले आहेत त्याची त्यांना अंतर्मनातून जाणीव झालेली असते.
✨ ते इथे फक्त आयुष्य जगण्यासाठी आलेले नाहीत, तर काहीतरी खोल, मोठा व अर्थपूर्ण उद्देश पूर्ण करण्यासाठी आले आहेत, याची त्यांना स्पष्ट जाणीव असते. 🩵🩵🩵
सर्व जागृत आत्म्यांना माझे हृदयापासून नमन व कृतज्ञतेसहीत खुप सारे प्रेम 💖🙏🫂
✍️Ppriyanka karle
कल्याण पश्चिम